किती काळ आराधना मीहि केली
किती रे तुझी पायरी झीजवीली
म्हणे भक्त ते तू असे विश्वव्यापी
तुझा अंश मी पाहिला ना कदापी
किती काळ तो साहणे द्वेष त्यांचा
किती शब्द प्रमाण मानू तयांचा
इथे भ्रष्ट मानव्यता ज्यांनि
केली
कसा मान राखू अशा देवतांचा
कुणा हीन मानू नको सुज्ञ बा
रे
इथे सर्व कच्चे जनांचे किनारे
कुणी आगळे नी कुणी वेगळाले
सदा माणसे शोधताती सहारे
कुणी गुंतले गुंतले या ठिकाणी
कुणी धन्य येथे कुणी त्या ठिकाणी
मजा वाटते हीन म्हणता कुणाला
रूचे साम्यता ही कुणाच्या मनाला
-मनोज बोबडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा